Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

महानुभाव पंथाच्या आशीर्वादाने फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील | lokvahini News | लोकवाहिनी |

महानुभाव पंथाच्या आशीर्वादाने फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील

आमदार परिणय फुके यांचे वक्तव्य

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कसून तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरु असून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार हे अद्याप युती आणि आघाडीने स्पष्ट केलेले नाही. एकीकडे महायुतीने हि निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली जाणार असल्याचे स्पष्ट केले असले तरीही मुख्यमंत्री कोण असेल हे निवडणुकीच्या निकालानंतरच ठरवणार असल्याची माहिती आहे. अश्यातच आता भाजपचे विधानपरिषद आमदार परिणय फुके यांनी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात मोठे वक्तव्य करत ‘राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावेत,’ अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस हे स्वतः मंचावर उपस्थित होते. यामुळे महायुतीत अद्यापही मुख्यमंत्रीपदावरून काही आलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

———

लालबागचा राजाचे दर्शन घेऊन फोडणार प्रचाराचा नारळ

अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याची रुपरेषा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. त्यातच आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सध्या सर्वच पक्षाचे नेते अॅक्शन मो़डमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते आगामी निवडणुकांबद्दल चर्चा करणार असल्याचे बोललं जात आहे. त्यासोबतच ते लालबागचा राजाचे दर्शनही घेणार आहेत.

————-

भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी

पोलिस कंट्रोल रूमला फोन

पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिस कंट्रोल रूमला फोन करत मला महेश लांडगे यांची सुपारी मिळाल्याचं सांगत लांडगे यांना दिली जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मोशी मधील तरुणाला या संदर्भात ताब्यात घेण्यात आलं आहे. उदय कुमार राय असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. भोसरी एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

———-

मराठे एकदिवस मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाहीत

प्रसाद लाड यांची टीका

दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलीच जुंपली होती. यावरून आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचे काम केले. एक दिवस हेच मराठे मनोज जरांगे पाटील यांचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. शनिवारी (दि.७) प्रसाद लाड हे मुंबईत बोलत होतेज्या पद्धतीने जरांगेंनी मराठ्यांचं नुकसान केलं. ईडब्लूएस बद्दल चुकीची माहिती दिली. मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं. एक दिवस हेच मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत”, असे प्रसाद लाड म्हणाले.

————–

चतुर्थीलाच विघ्न!

नदी पात्रात पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

नागपूर जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्हातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत नदी पात्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वृषभ राजेंद्र गाडगे आणि रोहन सुभाष साऊसाखडे अशी मृत मुलांची नावे आहे. ते दोघेही ८व्या वर्गात शिकत होते. काल शाळेला सुट्टी असल्याने गावाजवळील नदीत हे दोघेही पोहायला गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यानं एक मुलगा खोल पाण्यात बुडायला लागला. तर त्याला वाचवण्यासाठी गेलेला दुसरा मित्रही त्यात वाहवत गेला आणि बुडाला. गणेश चतुर्थीची सुट्टी असल्याने हे दोघे पाण्यात पोहायला गेले होते. मात्र हे नसतं साहस त्यांच्या चांगलेच अंगलट आले असून गणेश चतुर्थीलाच या दोघांवर विघ्न आले आहे. राज्यभरात एकीकडे गणेश उत्सवाचा आनंद साजरा करत असताना या अपघातामुळे परिसरात मात्र शोककळा पसरली आहे.

———-

भारत थांबवू शकतो रशिया-युक्रेन युद्ध

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे मोठे वक्तव्य

गेल्या महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या युद्ध सुरु आहे. युद्धादरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी जॉर्जिया मेलोनी यांनी भारताच्या भूमिकेवर जोर दिला आहे. शनिवारी एका वक्तव्यादरम्यान त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत आणि चीनच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल सांगितले.इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शनिवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर हे वक्तव्य केले आहे. रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष सोडवण्यासाठी भारत आणि चीन भूमिका बजावू शकतात, असे जॉर्जिया मेलोनी यांनी शनिवारी सांगितले. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर एका परिषदेच्यावेळी जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या

————

सुनीता केजरीवाल यांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे हरियाणाचे सुपुत्र असल्याचं सांगत त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. सत्ताधारी भाजपाच्या विरोधात उभं राहण्यासही सांगितलं. सुनीता केजरीवाल यांनी दावा केला की, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना खोट्या प्रकरणात जेलमध्ये टाकण्यात आलं आहे. तुमचा मुलगा सिंह आहे, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे झुकणार नाही, असंही त्या म्हणाल्या.जाहीर सभेला संबोधित करताना सुनीता केजरीवाल म्हणाल्या, “मी, तुमची सून असून हरियाणा हा अपमान सहन करेल का, हे विचारू इच्छिते. तुम्ही गप्प राहाल का? आणि तुमच्या मुलाला साथ देणार नाही का? सुनीता यांनी आरोप केला की, त्यांना फक्त सत्तेत राहायचं आहे आणि त्यांना समाजाच्या कल्याणासाठी काम करण्यात रस नाही. पक्ष फोडायचे आणि विरोधी नेत्यांना जेलमध्ये टाकायचं हेच भाजपाला माहीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles