Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

नागपूरसह विदर्भात कोणाचं वर्चस्व,कोणत्या पक्षाचे किती आमदार?

 

मुंबई (Mumbai) :- संपूर्ण राज्याला आतुरता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल आज वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोज आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित करणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. त्यामुळे आजच विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये झाल्या होत्या. त्यामुळे नवी विधानसभा त्यापूर्वीच अस्तित्वात येणे अपेक्षित आहे.  त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यात आचारसंहिता लागणार आहे. महाराष्ट्र विधानसभेत 288 आमदार  निवडले जातात. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी भाजप (BJP) आणि शिवसेना युती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यावेळी एकसंघ शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. भाजप-शिवसेना युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी लढली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती.

राज्यात सध्या भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता आहे. मात्र, नागपूरसह विदर्भात (Vidarbha) लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. परिणामी आगामी निवडणुकीत कोणात्या पक्षाची सत्ता येणार आता हा येणारा काळच ठरवणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles