छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) :- औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका अशी मागणी होते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ही मागणी केली आहे. त्यावर प्रतिक्रियाही उमटत आहेत. मात्र औरंगजेबाची कबर बांधली कुणी हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊ.
औरंगजेबाची कबर कुठे आहे?
औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातल्या खुलताबाद या ठिकाणी आहे. ही कबर अत्यंत साधेपणाने बांधली आहे. या कबरीवर अनेकदा फक्त पांढऱ्या रंगाची चादर असते. तसंच या कबरीवर सब्जाचं झाड आहे. औरंगजेबाची ही कबर कुणी बांधली? याचंही उत्तर आपण जाणून घेऊ.
औरंगजेब महाराष्ट्रात का आला होता?
छत्रपती शिवरायांचा मृत्यू १६८० मध्ये झाला. त्यानंतर चार लाखांचा फौजफाटा घेऊन औरंगजेब दख्खन जिंकण्यासाठी महाराष्ट्रात १६८१ मध्ये आला. औरंगजेबाला छत्रपती संभाजी राजांनी कडवी झुंज दिली. मात्र १६८९ मध्ये झालेल्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यात आलं. त्यानंतर औरंगजेबाने त्यांना हाल करुन ठार केलं. मात्र औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांना ठार केल्यानंतरही महाराष्ट्र जिंकता आला नाही.