आरजी कर रुग्णालय भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईला वेग
कोलकाता (Kolkata) 17 सप्टेंबर :- अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज, मंगळवारी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) आमदारांसह 6 ठिकाणी धाड टाकली आहे. कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयातील आर्थिक अनियमीतता प्रकरणी श्रीरामपूरचे आमदार सुदिप्तो रॉय, औषध विक्रेता यांच्या घरांसह इतर 4 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत.
कोलकात्यातील आरजी कार मेडिकल कॉलेज (Kolkata rape case) आणि हॉस्पिटलमधील आर्थिक अनियमिततेप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने तृणमूल काँग्रेसचे आमदार सुदीप्तो रॉय यांच्या निवासस्थानावर छापा टाकला आहे. याआधी आमदाराची केंद्रीय अन्वेषण विभागाने 12 सप्टेंबर रोजी कोलकात्याच्या सिंथी येथील निवासस्थानी चौकशी केली होती. टीएमसीचे आमदार स्वतः डॉक्टर आहेत आणि आरजी कार कॉलेजच्या रुग्ण कल्याण समितीचे प्रमुख आहेत. यापूर्वी, सीबीआयने आर्थिक अनियमिततेच्या चौकशीचा भाग म्हणून रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि त्यांच्या तीन साथीदारांना आधीच अटक केली होती. रुग्णालयातील महिला डॉक्टरवर कथित बलात्कार आणि हत्या झाल्यानंतर आर्थिक अनियमिततेची चौकशी सुरू झाली आहे.