जागतिक जलदिनानिमित्त नागपुरात जलजागृती सप्ताह व जलप्रदूषण चर्चा

0
47

जागतिक जलदिनानिमित्त नागपुरात जलजागृती सप्ताह व जलप्रदूषण चर्चा

नागपूर – विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर आणि भारतीय जलसंधारण संस्था नागपूर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जलदिन, जागृत जलजागृती सप्ताह आणि जलप्रदूषण चर्चासत्र तसेच समारोप कार्यक्रम २२ मार्च रोजी नियोजन भवन, माउंट रोड, सदर, नागपूर येथे पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता रवी पराते यांची उपस्थिती होती. जल प्रदुषण चर्चा सत्रात राष्ट्रीय आपदा मोचन बल अकादमीचे संचालक डॉ. हरिओम गांधी, व्हीएनआयटीचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. वसंत म्हैसाळकर, वास्तु विशारद प्रद्युम्न सहस्त्रभोजने आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.

मंचावर जलजागृती सप्ताहाचे जिल्हा समन्वयक इंजिनियर सोनाली चोपडे, गोसीखुर्द प्रकल्प मंडळ नागपूरचे अधीक्षक अभियंता इंजिनियर राजेश पाटील, भारतीय जलसंधारण संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण महाजन आणि सचिव इंजिनिअर राजेश ढुमणे यांचीही उपस्थिती होती.

या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मागील आठवड्याभरापासून घेण्यात आलेल्या जलसत्ताच्या माध्यमातून योग शिबिर रक्तदान शिबिर जल रेसिपी स्पर्धा यात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले जल रेसिपी स्पर्धेत प्रथम क्रमांक घेणारे द्वितीय तृतीय असे प्रशस्तीपत्र देऊन व सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आलं

या कार्यक्रमादरम्यान पाण्याच्या बचतीबाबत जनजागृती करण्यात आली तसेच जलप्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here