सोलापूर 22 मे: मामाकडे सोलापूरला सुट्टीसाठी आलेल्या तेलंगणा राज्यातील नऊ वर्षाच्या चिमुकला डंपरखाली चिरडून ठार झाला. नई जिंदगी परिसरातील नागनाथ नगर रोडवर हा अपघात झाला. जड वाहतुकीचा आणखी एक बळी गेल्याचे समोर आले आहे. असद गौस शेख (वय- ९, रा. पद्मावती नगर, बोराबंडा, अकलापूर, जि. कुकाडपल्ली सध्या नागनाथ नगर, नई जिंदगी, सोलापूर) असे या मयत चिमुकल्याचे नाव आहे. यातील मयत बालक असद गौस शेख हा बालक तेलंगणा राज्यातील बोराबंडा, अकलापूर येथे राहतो. शाळेला सुट्टी असल्याने तो सोलापूरला आजोळी मामा व आजीकडे आलेला होता. मामासोबत मोटारसायकलीवरुन घरकूुलकडे जात होता.
नागनाथ नगर, नई जिंदगी परिसरातील कच्च्या रस्त्यावरुन सुसाट वेगानं येणाऱ्या एम. एच. १३ डी क्यू ९१९६ हायवा डंबर वाहनानं पाठिमागून धडक दिली. यात मयत असद व मामा रोडवर पडले. भाच्चा असद हा हायवा वाहनाच्या पाठिमागच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. या घटनेची खबर एमआयडीसी पोलीस ठाण्याला मिळताच हवालदार एस. के. चव्हाण यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहचले. बेशुद्धावस्थेतील असद याला शासकीय रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.