Friday, August 1, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम काळाच्या पडद्याआड

गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज

मुंबई:- अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज पहाटे मुंबईत निधन झालं आहे. विजय कदम गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते आणि त्यांनी त्यावर मात केली होती, मात्र त्यांचा कॅन्सर पुन्हा बळावला, त्यामुळे त्यांना पुन्हा मुंबईतील अंधेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज पहाटे निधन झाले. विजय कदम 1980 आणि 90 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय होते. विजय कदम त्यांच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखले जात असे, त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिकाही केल्या. त्या मोठ्या प्रमाणावर गाजल्या. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम 67 वर्षांचे होते. पत्नी आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंधेरी – ओशिवरा येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles