Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

वसंत मोरे ‘या’ दिवशी ठाकरे गटात प्रवेश करणार

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट

मनसेला जय महाराष्ट्र करुन लोकसभा निवडणुकींच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेले महाराष्ट्र पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी, त्यांनी पुण्यातील आपल्या सहकाऱ्यांसमवेत उद्धव ठाकरेंसोबत चर्चाही केली. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत हेही यावेळी मातोश्रीवर होते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकांपूर्वीच संजय राऊत यांनी वसंत मोरेंना फोन करुन शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. मात्र, महाविकास आघाडीकडून लोकसभा उमेवारीची खात्री नसल्याने त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला होता. आता, लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. या भेटीत वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देण्यामागचं कारण सांगितलं. ”मी वंचितमध्ये गेलो होतो मात्र मतदारांनी मला स्वीकारलं नाही. जो मतांचा टक्का होता, पुण्यामध्ये तो मिळाला नाही. त्यामुळे मी 9 तारखेला ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती वसंत मोरे यांनी दिली आहे. तसेच मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो, माझा परतीचा प्रवास शिवसेनेकडे होतो. शिवसेनेकडून महानगरपालिकेत कडव आव्हान देऊ,असे देखील वसंत मोरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles