Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

फरिदाबादमध्ये तासाभरात भूकंपाचे 2 धक्के

नवी दिल्ली(New Delhi) 25 जुलै :- दिल्लीनजीकच्या फरिदाबादमध्ये आज, गुरुवारी सकाळी दोनदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले. तासाभरात दोनदा भूकंप झाल्याने लोक भयभीत झाले. दोन्ही वेळा समान तीव्रतेचे भूकंप झाले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.4 इतकी मोजली गेली.

यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.

हरियाणाच्या फरिदाबादमध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता खूपच कमी असल्याने नुकसान होण्याची शक्यता नाही. पण लागोपाठ 2 भूकंपामुळे लोक घाबरले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, दिल्लीला लागून असलेल्या फरीदाबादमध्ये सकाळी 10:54 वाजता भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.4 मोजली गेली. त्याचे केंद्र जमिनीपासून 5 किलोमीटर खाली होते. दुसरा भूकंप 11:43 वाजता झाला. केंद्र आणि तीव्रता देखील सारखीच होती. लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले नसले तरी तासाभरात दोनदा भूकंप झाल्याच्या बातम्यांनी नक्कीच भीती निर्माण झाली. तथापि, एकदा भूकंप झाला की आफ्टरशॉक अनुभवणे सामान्य आहे.

साधारणपणे 3 पेक्षा कमी तीव्रतेचे भूकंप जाणवत नाहीत. रिश्टर स्केलवर 5 पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपात नुकसान होण्याची शक्यता आहे. जर त्याची तीव्रता 7 पेक्षा जास्त असेल तर अलिकडच्या काळात दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे अनेक धक्के जाणवले आहेत. यमुनेच्या काठावर वसलेला हा परिसर भूकंपाच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानला जातो. दिल्ली-एनसीआरमध्ये उंच इमारतींमध्ये राहणारे लोक भूकंपामुळे घाबरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles