Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

विचार जिंकविण्यासाठीच प्रयत्न

संघ पदाधिकाऱ्यांची भाजपला स्पष्ट सूचना

नागपूर: आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नागपुरात समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत लोकसभा निवडणूकीतील (Maharashtra Assembly Election 2024) कामगिरीच्या मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. सोबतच पुढील निवडणुकीचे देश व संघविचार पुढे नेण्याच्या दृष्टीने किती महत्त्व आहे यावर मंथन करण्यात आले. या निवडणूकीत कुणाला मंत्री किंवा आमदार बनविण्यासाठी नव्हे तर विचार जिंकविण्यासाठीच प्रयत्न करण्याची सूचना संघाकडून भाजपला करण्यात आली.

नागपुरातील ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या (Blind Relief Association) मुंडले सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या समन्वय बैठकीला सहसरकार्यवाह अरुण कुमार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संघाचे विदर्भ प्रांत व क्षेत्राचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत संघ परिवारातील सर्व ३६ संघटनांचे विदर्भातील पदाधिकारी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles