Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

संसद आणि लाल किल्ला बॉम्बने उडवण्याची धमकी

राज्यसभा खासदाराला फोनवर धमकावण्यात आले

 

नवी दिल्ली(New Delhi)22 जुलै : खलिस्तानी दहशतवाद्यांनी दिल्लीतील लाल किल्ला आणि संसद भवन बॉम्बने उडवण्याची धमकी दिलीय. सीपीआयएमचे खासदार व्ही शिवदासन यांना हा धमकीचा फोन आलाय. याप्रकरणी खा. शिवदासन यांनी राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड(Jagdeep Dhankhad) यांना पत्र पाठवले आहे. केरळमधील सीपीआय(एम) खासदार व्ही. शिवदासन यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे की, मला शिख फॉर जस्टिसच्या नावाने धमकीचा फोन आला होता.

ही धमकी 21 जुलै रोजी रात्री 11.30 वाजता मिळाली. जेव्हा मला कॉल आला तेव्हा मी दिल्ली विमानतळ लाउंजमध्ये होतो आणि माझ्यासोबत खासदार ए रहीम थी होते. शीख फॉर जस्टिस खलिस्तानी सार्वमताचा संदेश देऊन भारतीय संसद भवन आणि लाल किल्ला परिसरात बॉम्बस्फोट करणारआहे. शिखांचे अस्तित्व धोक्यात असल्याने भारतीय राज्यकर्त्यांचे डोळे उघडणे हा यामागचा उद्देश आहे. खलिस्तानी जनमताचा अनुभव घ्यायचा नसेल तर घरीच रहा, असे फोनवर सांगितल्याचे व्ही शिवदासन म्हणाले. हा संदेश शिख फॉर जस्टिसचे जनरल काउंसिल गुरपतवंत सिंग पन्नू याच्या नावावर असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. व्ही शिवदासन यांनी या प्रकरणाची माहिती नवी दिल्लीच्या पोलिस उपायुक्तांना दिली आणि तक्रार दाखल केली आहे. त्यांनीही या प्रकरणाची दखल घेत पुढील कारवाईची विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles