मुंबई १९ जून:- भारताचा गोल्डनबॉय आणि उत्तम भालाफेकपटू नीरज चोप्राने पावो नूरमी गेम्स २०२४ मध्ये सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं आहे. नीरजने पहिल्यांदाच या खेळात सुवर्णपदक जिंकलं आहे.
नीरज २०२३ मध्ये या स्पर्धेत भाग घेऊ शकला नव्हता. तर २०२२ मध्ये त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. मात्र मंगळवारी फिनलँडमध्ये झालेल्या पावो नूरमी गेम्स स्पर्धेत नीरज चोप्राने ८५.९७ मीटर दूर भाला फेकत सुवर्ण पदक जिंकलं आहे. नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) या कामगिरीचं देशात कौतुक होतं आहे. नीरजच्या नंतर त्याचा प्रतिस्पर्धी टोनी केरानेन याने ८४.१९ मीटर दूर भाला फेकला होता. त्याला रौप्य पदक देण्यात आलं. तर ओलिवयर हेलांडरने ८३.९६ मीटर अंतरावर भाला फेकला त्याला कांस्य पदक देऊन गौरवण्यात आलं.
दोहा डायमंड लीग आणि फेडरेशन कपनंतर नीरजची वर्षातील तिसरी स्पर्धा असेल. गेल्या महिन्यात भुवनेश्वर येथे झालेल्या २७ व्या फेडरेशन कपमध्ये नीराने दोहामध्ये ८८.३६ मीटर थ्रोसह दुसरे स्थान पटकावले आणि ८२.२७ मीटर थ्रोने त्याला अव्वल स्थान मिळवून दिले.