Sunday, June 22, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

अमरावतीत उद्याोगक्षेत्राच्या विकासाला वाव

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडून गुंतवणुकीची प्रतीक्षा

अमरावती (Amaravti):- औद्याोगिक मागासलेपणाचे शल्य बाळगणाऱ्या अमरावती जिल्ह्यात अलीकडच्या काळात पायाभूत सुविधांच्या उभारणीकडे लक्ष दिले जात आहे. विमानतळ कार्यान्वित होणे, पीएम-मित्र मेगा टेक्स्टाइल पार्कच्या उभारणीच्या हालचाली यामुळे अमरावती जिल्हा विकासाच्या वाटेवर आश्वासकपणे वाटचाल करीत आहे. दळणवळणाच्या सुविधा वाढल्या आहेत. उद्याोगक्षेत्राच्या विकासाला अजून बराच वाव आहे. विशेषत: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्याोगांच्या उभारणीची प्रतीक्षा आहे.

अमरावती जिल्हा हे पश्चिम विदर्भाचे महसूल मुख्यालय असल्याने अमरावती शहराचा इतर जिल्ह्यांशी संबंध अधिकच जवळचा झाला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगा, मेळघाट हा डोंगराळ आणि घनदाट जंगलाचा भाग, असे भौगोलिक वैविध्य आहे. येथील जमीन ‘ब्लॅक कॉटन सॉइल’ या नावाने ओळखली जाते. तापी, वर्धा, पूर्णा या प्रमुख नद्यांसह पेढी, चंद्रभागा, शहानूर, बोर्डा व इतर नद्यांनी पिण्याचा पाण्याचा स्राोत उपलब्ध करून दिला आहे. संत्री, सोयाबीन, कापूस यावर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून आहे. नांदगावपेठ औद्याोगिक वसाहतीत पीएम-मित्र मेगा टेक्स्टाइल पार्क उभारला जात आहे.

अमरावती जिल्ह्यात सध्या एकूण २१३ नोंदणीकृत कारखाने असून हे सर्व कारखाने सुरू आहेत. त्यात सुमारे १४ हजार ७३४ कामगार कार्यरत आहेत. १७ मोठ्या कारखान्यांमध्ये ८ हजार कामगार आहेत. यात २ हजार ३८७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांची संख्या २२ हजार ९० इतकी असून त्यातून ७४ हजार २०६ जणांना रोजगार मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles