Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये , रतन टाटांना भारतरत्न द्याच

मुंबई (Mumbai) :- भारतातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. कट्टर देशभक्त आणि समाजसेवेचा आदर्श जगासमोर उभे करणाऱ्या उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर देश शोकसागरात बुडाला आहे. रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त येताच, सोशल मीडियातून त्यांना श्रद्धांजली अर्पित केली जात आहे. भारताचा कोहिनुर, एन्ड ऑफ इरा, प्राईड ऑफ इंडिया, वुई मिस, द ग्रेटेस्ट… या हॅशटॅगसह सोशल मीडिया भावुक झाला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरून रतन टाटा यांचे फोटो आणि आठवणी शेअर केल्या जात आहेत. तसेच, रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी पुन्हा सुरू झाली आहे. रतन टाटा  यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी केली जात असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रतन टाटांना भारतरत्न देण्याची विनंती केंद्राला करणारा प्रस्ताव संमत केल्याची माहिती दिली. आता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून रतन टाटा यांना भारतरत्न  देण्याची मागणी केली आहे.

रतन टाटा (Ratan Tata) यांच्या उद्योगपती आयुष्यात दडलेला साधा, सरळ आणि समाजाच्या मदतीला धावून जाणारा असामान्य व्यक्ती प्रत्येकजण आपल्या अनुभवातून उलगडत आहे. त्यांच्या निधनानंतर जगभराती दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात असून शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. ट्विटरवर काही क्षणातच लाखो ट्विट्समधून रतन टाटांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडले जात आहेत. द्रष्टा, दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रमी, नफा -तोटा न पाहणारे रतन टाटा सांगण्याचा प्रयत्न नेटिझन्सकडून होत आहेत. तसेच, यापूर्वी करण्यात येत असेलली, भारतरत्न देण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. त्यामुळे, राज्य सरकारनेही तसा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळ बैठकीत संमत केला आहे. दुसरीकडे राज ठाकरेंनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत पत्र लिहिले आहे.

ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच ‘भारतरत्न'(Bharatratna)सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे. तसेच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी नरेद्र मोदींकडे मागणी केली आहे.

Mumbai se
Mumbai City
Mumbai map
Mumbai Pin Code
Mumbai News
Mumbai game
Mumbai University
Mumbai population

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles