Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

इतक्या किमतीने सोन्याचे भाव झाले कमी !!!

सोनेचांदी विकत घेणाऱ्यांना दिलासा

शेअर बाजारात तेजी-मंदीने सोने बाजार अस्थिर होत आहे. तर दुसरीकडे पितृपक्षाच्या सुरुवातीलाच सोने-चांदीचे भाव कमी झाले आहेत. चार दिवसापूर्वी एका तोळ्यामागे साधारण 2000 रुपयांची वाढ झाल्यानंतर पितृपक्षाच्या सुरुवातीलाच सोन्याचांदीचा भाव गडगडला आहे. कालच गणपती विसर्जन झाले, त्यानंतर आजपासून पितृपक्ष सुरु झाले आहे. त्यामुळे ज्यांना आता सोनेचांदी विकत घ्यायचे आहे, त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे

आजच्या सोन्याच्या भावानुसार 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमसाठी 73,350 रुपये भाव झाला आहे. कालपेक्षा साधारण 200 रुपयांनी हा भाव उतरला आहे. (Gold Silver Prices) तर चांदीचा दर एका किलोमागे 89,230 रुपये झाला आहे. आठवड्याभरापेक्षा हा दर अधिक असून मागील एका दिवसाच्या तुलनेत हा दर कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता सोन्याला तोळ्यामागे 22 कॅरेटला 78,425 रुपये मोजावे लागणार आहेत, तर चांदीला किलोमागे 88,500 रुपये द्यावे लागणार आहेत.

राष्ट्रीय बाजारामध्ये एकीकडे सोन्या चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीच्या दरात वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता सोन्याची खरेदी करणे परवडत नाही. तसेच पुढच्या काळामध्ये सोने आणि चांदी किंमती गगनाला भिडू शकतात असा अंदाज देखील काही जाणकारांनी दिला आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने येत्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात नवीन मागणी येऊ शकते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

बघुया कोणत्या शहरात काय भाव ?

मुंबई – सोने – 73,210 प्रति 10 ग्रॅम

पुणे – सोने – 73,210 प्रति 10 ग्रॅम

औरंगाबाद – सोने – 73,240 प्रति 10 ग्रॅम

नाशिक – सोने – 73,240 प्रति 10 ग्रॅम

नागपूर – सोने – 73,240

सोलापूर – 73,240 प्रति 10 ग्रॅम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles