नागभीड(Nagbhid) ८ जुलै :- येथील जनसंपर्क कार्यालयात तालुक्यातील एकूण २१ मत्स्यव्यवसायीक सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ढीवर भोई समाज सेवा संघ नागभीड तालुकाध्यक्ष गुलाबरावजी भानारकर व सचिव गिरीश नगरे यांच्या नेतृत्वात त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात भेट घेतली.
तेव्हा, बैठकीत आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांसोबत यशस्वीरीत्या चर्चा केल्यानंतर सर्व मागण्यांवर जलदगतीने सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. तसेच, आपण सदैव ढिवर भोई समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील व तत्पर राहणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. दरम्यान, समस्त ढीवर भोई समाज व मत्स्यव्यवसायीक सहकारी संस्थांच्या वतीने आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचे पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत केले आणि आभार व्यक्त केले. तसेच समाज सदैव त्यांच्या सोबतच असल्याचा दृढ विश्वास व्यक्त केला

यावेळी ढीवर भोई समाज सेवा संघ नागभीड तालुकाध्यक्ष गुलाबरावजी भानारकर, सचिव गिरीश नगरे, ढीवर भोई समाज सेवा संघ नागभीड तालुका पदाधिकारी निलकंठ चांदेकर, नागोजी भानारकर, होमदेव नान्हे सर, सरपंच्या ग्रा. पं. कोजबी (माल) शेवंताबाई सोमाजी भोयर यांच्यासह १) जेठूबाबा मत्स्यव्यवसायीक सह. संस्था मर्या. मिंडाळा, २) मत्स्यगंधा मत्स्यव्यवसायीक सह. संस्था मर्या. नवखळा, ३) मच्छिन्द्रनाथ मत्स्यव्यवसायीक सह. संस्था मर्या. बाळापूर, ४) वासाळा मेंढा मत्स्यव्यवसायीक सह. संस्था मर्या. वासाळा मेंढा, ५) एकलव्य मत्स्यव्यवसायीक सह. संस्था मर्या. आलेवाही, ६) गोपाळ मत्स्यव्यवसायीक सह. संस्था मर्या. पहार्णी, ७) गुरुदेव मच्छिन्द्रनाथ मत्स्यव्यवसायीक सह. संस्था मर्या. नागभीड, ८) मत्स्यप्रभा मत्स्यव्यवसायीक सह. संस्था मर्या. कोसंबी गवळी, ९) गोरक्ष मत्स्यव्यवसायीक सह. संस्था मर्या. जनकापूर, १०) विकास मत्स्यव्यवसायीक सह. संस्था मर्या. पारडी (ठवरे.), ११) ग्रामोद्योग मत्स्यव्यवसायीक सह. संस्था मर्या. तळोधी (बा.), १२) आदर्श मत्स्यव्यवसायीक सह. संस्था मर्या. गोविंदपूर, १३) मच्छिन्द्रनाथ मत्स्यव्यवसायीक सह. संस्था मर्या. मांगरूड, १४) वाल्मिकी मच्छिन्द्रनाथ मत्स्यव्यवसायीक सह. संस्था मर्या. वाढोणा, १५) लुंबीनी मागा. मत्स्यव्यवसायीक सह. संस्था मर्या. उसराळ मेंढा, १६) मच्छिन्द्रनाथ मत्स्यव्यवसायीक सह. संस्था मर्या. कोजबी (माल), १७) जयभारत मत्स्यव्यवसायीक सह. संस्था मर्या. नांदेड, १८) व्यास मत्स्यव्यवसायीक सह. संस्था मर्या. गिरगाव, १९) मत्स्यगंधा मत्स्यव्यवसायीक सह. संस्था मर्या. वैजापूर, २०) नवनाथ मत्स्यव्यवसायीक सह. संस्था मर्या. येनोली, २१) वाल्मिकी मत्स्यव्यवसायीक सह. संस्था मर्या, कन्हाळगाव या संस्थांचे अध्यक्ष, सचिव व अन्य पदाधिकारी, समाजबांधव आणि भाजपा नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते