मुंबई (Mumbai) :- देशातील सर्वात मोठ्या आणि सर्वात महागड्या हॉटेल व्यवसायाची साखळी म्हणून नावाजलेल्या ताज हॉटेल (Taj Hotel) समुहावर सध्या कौतुकाता वर्षाव होत आहे. निमित्त ठरत आहे ते म्हणजे या समुहानं मिळवलेलं यश. ताज हॉटेल्स चालवणाच्या अर्थात या समुहाच्या कार्यकारिणी आणि व्यवस्थापनावर लक्ष ठेवणाऱ्या इंडियन होटल्स कंपनी लिमिटेड (IHCL) नं तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा मार्केट कॅप अर्थात कंपनी मूल्य गाठत असं करणारी ही पहिली भारतीय हॉस्पिटॅलिटी कंपनी ठरली आहे. ज्यामुळं शेअर मार्केटपासून ते अगदी हॉटेल व्यवसायाच्या क्षेत्रापर्यंत फक्त आणि फक्त ताज हॉटेल्सचीच चर्चा सुरू आहे
मुंबईतील अपोलो बंदर इथं अतिशय दिमाखात असणाऱ्य हॉटेल ताजच्या ऐतिहासिक इमारतीत एकदातरी मुक्काम करणं हे अनेकांचच स्वप्न असतं. काहीचं हे स्वप्न साकार होतंही, पण काहीजण बाहेरूनच या सुरेख ठिकाणाला न्हाहाळताना दिसतात.
- ताज क्लब रून सिटी व्ह्यू – ₹ 28,000
- ताज क्लब रून सी व्ह्यू – ₹ 32,000
- एक्झिक्युटीव्ह सुईट वन बेडरून सिटी व्ह्यू- ₹ 51,000 ते ₹ 62,000
- लक्झरी सुईट वन बेडरुम सिटी व्ह्यू- ₹ 59,500 ते ₹ 72,000
- ग्रँड लक्झरी वन बेडरुम सी व्ह्यू- ₹ 93,500 ते ₹ 1,12,000
वरील रुमव्यतिरिक्त हॉटेलमध्ये लक्झरी रुम, लक्झरी ग्रँड रुम सिटी व्ह्यू, , लक्झरी ग्रँड रुम सी व्ह्यू, सिग्नेचर सुईट आणि द टाटा सुईट अशा अविस्मरणीय अनुभव देणाऱ्या रुमसुद्धा उपलब्ध आहेत.