विदर्भातील सहा जणांना संधी
नागपूर (Nagpur) :- महाराष्ट्र राज्य सरकारचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूर येथील राजभवनात थाटात पडला. सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा मंत्र्यांचा हा शपथविधी प्रतिक्षित होता.
राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यावेळी मंचावर उपस्थित होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांच्यासह एकूण ३९ मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादा भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, शंभुराज देसाई, ॲड. आशीष शेलार, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रराजे भासले, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मकरंद जाधव, नीतेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर यांनी कॅबीनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
माधुरी मिसाळ, आशीष जयस्वाल, पंकज भोयर, बोर्डीकर मेघना, इंद्रनील नाईक, योगेश कदम यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
जुनी, वरिष्ठ नावे टाळून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
क्षणचित्रे
* सर्व मंत्र्यांनी ईश्वर साक्षीने शपथ घेतली
* मंगलप्रभात लोढा यांनी संस्कृतमधून तर इतर मंत्र्यांनी मराठीतून शपथ घेतली
* गणेश नाईक यांनी राज्यपालांनी सुरुवात करून देण्यापूर्वीच शपथ घ्यायला सुरुवात केली. नंतर राज्यपालांनी “मी” म्हणून त्यांना शपथ दिली
* पंकजा व धनंजय हे चुलत बहीण भाऊ यंदा मंत्रिमंडळात असतील
* प्रत्येक मंत्र्यांची शपथ आटोपली की राज्यापालांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
* पंकजा मुंडे, आदिती तटकरे, माधुरी मिसाळ, बोर्डीकर मेघना दीपक काचोरे या महिला सदस्यांना फडणवीस मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
* एकूण ३३ कॅबिनेट, तर ६ राज्यमंत्र्यांना या समारंभात मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
* एकनाथ शिंदे यांच्या गटातील जवळपास प्रत्येकच मंत्र्याने
* पंकज योगेश मुंडे, नीतेश राणे, आदिती तटकरे, आकाश फुंडकर, योगेश कदम, इंद्रनील नाईक ही, घरातून राजकीय वारसा लाभलेली नावे असून, या सर्वांचे वडील कधी ना कधी मंत्री राहिले आहेत.
* राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने या शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता झाली.
विदर्भातील मंत्री
रविवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भातील चंद्रशेखर बावनकुळे, संजय राठोड, आकाश फुंडकर, आशीष जयस्वाल, पंकज भोयर, इंद्रनील नाईक या सहा वैदर्भीय लोकप्रतिनिधींना मंत्री म्हणून स्थान मिळाले आहे.