Wednesday, August 6, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

चंद्रपूर जिल्ह्यात “स्वच्छ माझे अंगण” अभियान

वैयक्तिक शौचालय वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणाऱ्या कुटूंबांचा होणार गौरव

चंद्रपूर (Chandrapur) 4 जानेवारी :- चंद्रपूर जिल्ह्यात 20 जानेवारीपर्यंत “स्वच्छ माझे अंगण” अभियान राबविण्यात येत असून वैयक्तिक शौचालया वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणाऱ्या कुटूंबांचा होणार गौरव होणार आहे.दरम्यान

गावस्तरावर अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी : मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

कुटूंबस्तरावर वैयक्तिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन स्वच्छतेची सवय अंगीकृत करणे, नियमितपणे वापर करणाऱ्या कुटूंबांना प्रोत्साहन देणे, त्यांचे अनुकरण करण्याकरीता इतर ग्रामस्थांना, कुटूंबधारकांना त्यांच्याप्रमाणे वैयक्तिक स्वच्छता सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 1 ते 20 जानेवारी या कालावधीत स्वच्छ माझे अंगण अभियान राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा 2 अंतर्गत कुटूंबस्तरावर वैयक्तिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत जिल्ह्यात ज्या कुटुंबानी वैयक्तिक शौचालय वापर, सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डा, परसबाग, पाझर खड्डा, घनकचरा व्यवस्थापना करिता कंपोस्ट खतखड्डा अथवा घरगुती खतखड्डा तसेच कुटुंब स्तरावर कचराकुंड्या या बाबतची उपलब्धता करून घेतली,. अशा कुटुंबांना प्रोत्साहन देत इतरही कुटुंबांनी त्यांचे अनुकरण करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येत आहे. देखभाल दुरुस्ती करण्यासाठी कुटुंबाने पुढाकार घेणे, घरगुती स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण करणे, कुटुंबस्तरावर सुका, ओला कचराकुंड्यांमध्ये वर्गीकरण करणे, वर्गीकरण केलेल्या घरगुती कचऱ्याचे कंपोस्ट खतखड्डा किंवा घरगुती खतखड्डा निर्मिती करून , घराच्या परिसरात व्यवस्थापण करणे, परसबाग, पाझरखड्डा, शोषखड्ड्याद्वारे घरगुतीस्तरावर सांडपाणी व्यवस्थापनावर अभियानात विशेष भर देण्यात आला आहे.

सर्व प्रथम अभियानाची माहिती दवंडी देऊन, गावातील सुचना फलकांवर लावून गावात ग्रामस्थांना माहिती द्यायची आहे. त्यानंतर 1 ते 20 जानेवारी या कालावधीत या अभियानाची अंमलबजावणी करायची आहे. 21 ते 24 जानेवारी या कालावधीत पाणी पुरवठा व स्वच्छता समिती मार्फतीने वैयक्तिक स्तरावर शौचालयाचा वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणाऱ्या कुटूंबांची पडताळणी करून, कुटूंबांची निवड करायची आहे. ज्या कुटूंबाची निवड करावयाची आहे, त्यांच्याकडे किंवा परिसरात घरगुती खतखड्डा, परसबाग, वैयक्तिक शोषखड्डा, पाझर खड्डा, वैयक्तिक शौचालय, घरगुती कचराकुंड्या आदी सुविधा असणे आवश्यक आहे. उत्कृष्ट व्यवस्थापन करणाऱ्या कुटंबांना 26 जानेवारीला ग्रामसभेमध्ये सरपंच व ग्राम पंचायत अधिकारी यांचे संयुक्त स्वाक्षरीने प्रशस्तीपत्र, श्रीफळ, पुष्प देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. “स्वच्छ माझे अंगण अभियान” अंमलबजावणी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.) नूतन सावंत यांचे नेतृत्वात करण्यात आले असून, सर्व पंचायत समितीतरावर गट विकास अधिकारी यांना अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार गावस्तरावर स्वच्छ माझे अंगण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

Chandrapur history in marathi
Chandrapur newspaper
Chandrapur in which district
Chandrapur is famous for
Chandrapur tourist places
Chandrapur in which state
Chandrapur area
Chandrapur Map

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles