Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला | lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबरमध्ये केले होते उद्घाटन

मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना आज, सोमवारी दुपारी घडली. पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त झाले होते. ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. छत्रपतींचा पुतळा कोसळल्यामुळे येथील शिवप्रेमी संतप्त झाले असून निकृष्ट बांधकामामुळे हा पुतळा पडला असल्याचा आरोप केला आहे.
———–

केंद्राप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांनाही मूळ वेतनाच्या 50 टक्के पेन्शन

केंद्राची युनिफाइड पेन्शन योजना लागू करणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरले

जुन्या पेन्शन योजनेची मागणी लावून धरलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या नव्या युनिफाइड पेन्शन योजनेप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही मूळ वेतनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शनची हमी देणारी योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आलि आहे केंद्र सरकारनेसरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन ‘एकीकृत पेन्शन योजने’स (यूपीएस) मंजुरी दिली. कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यासह शेवटच्या १२ महिन्यांतील मूळ वेतनाच्या ५० टक्के पेन्शन देण्याची हमी या योजनेत आहे. शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी निर्णयासंदर्भात माहिती दिली.
————

त्या असत्या तर हा प्रकार घडला नसता

बदलापूर प्रकरणात दीपक केसरकर यांचं मोठं विधान.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. शिवाय या प्रकरणात कलमांमध्ये वाढ करण्यात आली असून कलम 6 आणि 21 वाढवण्यात आलेत.. शाळेतील सीसीटीव्हीचं फुटेज 15 दिवसांपासून गायब असल्याची कबुली शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिलीय. याप्रकरणी कारवाई करण्याची शिफारस केल्याचं केसरकरांनी म्हटलंय. अहवालावर लवकरच निर्णय घेणार असल्याचं केसरकरांनी सांगितलं. महिला सुरक्षेसाठी मोबाईलमध्ये पॅनिक बटणाची व्यवस्था केली जाणार असल्याचंही ते म्हणाले. दोषींवर पोक्सोअंतर्गत कारवाई करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहितीही केसरकरांनी दिली.
————

 

भाजपकडून लावण्यात आलेले लाडकी बहीण योजनेचे बॅनर फाडले

अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या योजनेसाठी आजघडीला कोट्यवधी महिलांनी अर्ज केलेले असून त्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यावर सरकारने पैसे पाठवण्यास सुरुवातही केलेली आहे. तर 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये दिले जातील. दरम्यान, काही महिलांच्या अर्जात काही त्रुटी असल्यामुळे ते नामंजूर करण्यात आले आहेत. अशा महिलांना आता सरकारने आणखी एक संधी दिली आहे.
————-

राज्य सरकारचा मोठा निर्णय

सरकारने घेतली दोन्ही पीडित मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

बदलापूर प्रकणातील दोन्ही पीडित चिमुलकल्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. “शिक्षण विभागाकडून मुलींच्या वडिलांना १० लाख रुपये मदत देण्यात आली आहे आणि त्या मुलीच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी ही आमच्या खात्याकडून घेण्यात येणार आहे. पदवी होईपर्यंत तिला मदत दिली जाणार आहे”, अशी महत्त्वाची माहिती दीपक केसरकर यांनी दिली. तसेच “यात दोन केसेस आहे. एक असॉल्ट आणि एक रेप. रेपमध्ये १० लाख भरपाई देतात. असॉल्टमध्ये 3 लाखांची मदत देतात. त्या मुलींना शाळेत प्रवेश देण्याची मदत केली जाईल. ही मदत वैयक्तीक करण्यात येईल. १० लाखाच्या व्यतिरिक्त दोघींना मदत केली जाणार आहे.
———-

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची प्रकृती खालावली

लीलावती रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची प्रकृती खालावली आहे. अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने बाबा सिद्दीकी यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसांपासून ते लीलावती रुग्णालयात अॅडमिट आहेत. फूड पॉइजनिंग झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या बाबा सिद्दिकी यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे
———-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles