Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

राज्यात राजकीय घडामोडींना वेग | lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News

मुंबईत मुसळधार पाऊस
विदर्भात रेड अलर्टमुळे शाळांना सुट्टी
राज्यात पावसाने जोर धरला आहे. मुंबईत पहाटेपासूनच धुव्वाधार पाऊस सुरु आहे. मुंबई शहरासह उपनगराला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. तर, नागपुरातही जोरदार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाकडून आजही विदर्भाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, नागपुरातही आज जोरदार पाऊस बरसणार असून पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईशिवाय ठाणे, पालघरमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
———–
शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार अ
मित शाह यांचा हल्लाबोल
भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. राज्यात शरद पवार यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केला आहे . आम्ही 2014 ला मराठ्यांना आरक्षण दिले. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवं. यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल”, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यातील भाजपच्या मेळाव्यात घेतली होती. दरम्यान, अमित शाहांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाहांनी आरोप केलेले डर्टी डझन नेते आज त्यांच्यासोबत सत्तेत बसले आहेत, असं सुळे म्हणाल्या आहेत.
————
विधानसभा एकत्र, पण महापालिका स्वतंत्र लढणार
अजित पवारांची पुण्यातून घोषणा
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवण्यावर ठाम आहेत. महायुतीकडून सध्या पक्षांचे मेळावे घेतले जात आहे, पण या मेळाव्यातूनही ते महायुतीचंच सरकार येणार, महायुतीच जिंकणार असल्याचा दावा करत आहेत. पुण्यात आज भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे पार पडत असून पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यातून अजित पवारांनी तुफान बॅटिंग केली. यावेळी, लोकसभा निवडणुका आपण एकत्र लढलो, आता विधानसभा निवडणुकाही एकत्रच लढणार आहोत. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढायच्या आहेत, अशी घोषणाच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यामुळे, महायुती ही केवळ विधानसभेपुरतीच असल्याचं स्पष्ट झालं असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राजकीय पक्ष स्वतंत्र मैदानात उतरणार असल्याचं दिसून येतं.
————-
राज्यात राजकीय घडामोडींना वेग
शरद पवार घेणार एकनाथ शिंदेंची भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट होणार आहे. या भेटीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं”, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणासाठी बसले आहेत. तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरु असलेल्या आंदोलनावर सत्ताधारी महायुती आणि महाविकासआघाडीतील घटक पक्ष आमने सामने आले आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणरा असल्याचे बोललं जात आहे. या भेटीत मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
————
नागपूरमध्ये कुख्यात गुंडाचा नवा हैदोस
बाईकवर प्रेयसीसोबत खुल्लमखुल्ला रोमान्स
राज्याच्या उपराजधानी नागपुरात धावत्या कारमध्ये प्रेयसीसोबत अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नागपूरमध्ये एक संतापजनक व्हिडिओ समोर आलाय. चालत्या दुचाकीवर प्रेयसीसोबत अश्लील कृत्यकरणाऱ्या एका कुख्यात गुंडाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दुचाकीवर अश्लील चाळे करत पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी या गुंडावर गुन्हा दाखल केला आहे.
————
उद्योजकाची गेट वे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात उडी घेत आत्महत्या
65 वर्षीय हिरे व्यावसायिकाने गेट वे ऑफ इंडिया इथून समुद्रात उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली आहे. ताज हॉटेल येथील सीसीटिव्ही कॅमेरा तपासल्यानंतर वृद्धाने कुलाबा येथे समुद्रात उडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी सकाळी 9.30 च्या सुमारास ताज हॉटेलच्या समोरच ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय शांतीलाल शहा असं या व्यावसायिकाचे नाव आहे. ते महालक्ष्मी येथे आपल्या कुटुंबासह राहतात. संजय शहा हे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून डिप्रेशनमध्ये होते. व्यवसायात नुकसान झाल्यामुळं ते तणावात होते. म्हणूनच त्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत असून अद्याप पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडली नाहीये.
———-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles