Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

बच्चू कडूंजवळ सहा लाख रोख; १० लाखांचे कर्ज

अमरावती : दिव्यांगांसह सर्वसामान्यांसाठी शासनावर सातत्याने प्रहार करणारे अचलपूरचे आमदार बच्चू कड्डू पाचव्यांचा रिंगणात आहे. त्यांनी सोमवारी प्रहार पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्याजवळ सहा लाखांची कॅश असल्याचे नमूद केले आहे.

कडू यांची जंगम मालमत्ता ५०.३८, लाख, तर स्थावर मालमत्ता ५५.५५ लाख आहे. त्यांच्यावर १०.८७ लाखांचे कर्ज आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे ५९.६९ लाखांची जंगम, तर २.४५ कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचे शपथपत्रात नमूद आहे. सन २०१९ मध्ये बच्चू कडू यांच्याजवळ ३०.८१ लाखांची जंगम व १.१८ कोटींची स्थावर मालमत्ता व ९०.८१ लाखांचे कर्ज असल्याचे शपथपत्रात नमूद होते. कडू यांच्या मुंबईस्थित एसबीआय खात्यात २.३१ लाख, बेलोऱ्याच्या एडीसीसी खात्यात ९.५० लाख जमा आहेत. प्रहार फूड लिमिटेडमध्ये चार लाखांचे शेअर्स, दोन एलआयसी पॉलिसीज, ४५ ग्रॅम सोने व अर्धा किलो चांदी आहे. त्यांच्या मालकीचे १८ लाखांची चारचाकी आहे त्यांच्या पत्नी नयना कडू यांच्या विविध बँक खात्यात १४.०७ लाख जमा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles