आज सोन्या-चांदीच्या (Silver Rate) दरात मोठा बदल झाला आहे. आज १३ मे रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ८६६ रुपये प्रति १० ग्रॅम ने वाढून ९३,९४२ रुपये झाला. तर, चांदी २२५५ रुपयांनी वधारून ९६,३५० रुपये प्रति किलो ग्रॅम झाली.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत. यात जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात.
जीएसटीमुळे आज सोनं (Gold Rate) ९६,७६० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ९९,२४० रुपये प्रति किलो दरानं विकली जात आहे. यंदा सोनं जवळपास १८,२०२ रुपयांनी तर चांदी १०,३३३ रुपयांनी महागली आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याचा भाव ९९,१०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या उच्चांकी पातळीवर होता. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सोन्याचा भाव ७६,०४५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर ८५,६८० रुपये प्रति किलो होता. या दिवशी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली. सोनं आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून ५१५८ रुपयांनी स्वस्त आहे.