Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

सिंधुदुर्गात शिवसेना शिंदे गटाला धक्का

 

सिंधुदुर्ग (Sindhudurg) :- कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत ठाकरे सेनेत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सावंतवाडी येथील जाहीर सभेत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. ब्रिगेडियर सुधीर सावंत हे काँग्रेसमधून खासदार होते. त्यांनतर त्यांनी स्वतःचा स्वराज पक्ष काढला होता. नंतर ते आम आदमी पार्टीत सामील झाले होते. शिवसेना शिंदे गटाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी तिथे प्रवेश केला होता. आज ते शिवसेना शिंदे गटामधून ठाकरे सेनेत प्रवेश करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागा आहेत. यात कुडाळ आणि सावंतवाडी या दोन जागा शिवसेना (Shiv Sena) शिंदे गट आणि कणकवलीची जागा भाजपाकडे आहे.

कुडाळमधून विद्यमान खासदार नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. सावंतवाडीतून दीपक केसरकर उभे आहेत. कणकवलीतून नितेश राणे आहेत. ते भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढतायत. निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपासोडून शिवबंधन हाती बांधलं. हे तिन्ही नेते महायुतीमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार नारायण राणे यांना या तिन्ही मतदारसंघातून मोठ मताधिक्क्य मिळालं होतं. त्यामुळे विधानसभेला महायुतीच्या या तिन्ही जागा निवडून येण्याची शक्यता आहे.

माजी खासदार सुधीर सावंत (Sudhir Sawant) यांनी पक्ष सोडल्यामुळे शिवसेना शिंदे गटाला तसा फार फरक पडणार नाही. कारण आतापर्यंत त्यांनी अनेक पक्ष बदलले आहेत. सुधीर सावंत यांनी तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा दिवंगत प्रभा राव आणि प्रभारी मार्गारेट अल्वा यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. 2008 ला पक्ष विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर मायावतींच्या बहुजन समाज पक्षात प्रवेश करून महाराष्ट्रात काम केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles