मुंबई (Mumbai) :- महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रॅंड ॲम्बेसिडर म्हणून गायक शंकर महादेवन आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्याकडून सह्याद्री अतिथिगृहावर या निवडीनंतर दोघांचाही सत्कार करण्यात आला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार यांची यावेळी उपस्थिती होती.
उपस्थित मंत्र्यांकडून या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 या कायद्यामुळे राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा वेळेत (Sonali Kulkarni) आणि पारदर्शकपणे मिळण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य कार्य म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे, हे सुनिश्चित करणे.
महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क (Shankar Mahadevan) अधिनियम 2015 पारित करण्यात आला. महाराष्ट्रात 28 एप्रिल 2015 पासून हा कायदा अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे.