Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

अव्दय गवांदे सीबीएससी परीक्षेत 97 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण

अहमदनगर: सह्याद्री बहुजन शिक्षण संस्थेचे रजिस्टर आचार्य बाबुराव गवांदे यांचा नातू अद्वय उदय गवांदे हा इयत्ता दहावी मध्ये बंगलोर येथील जैन हेरिटेज स्कूल मध्ये ९७ टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे.

आचार्य बाबुराव गवांदे यांच्या शिक्षण क्षेत्रातील कामगिरीतून प्रेरणाचे त्यांचा मुलगा उदय हा सध्या बंगलोर येथील कंपनीत सी व पदावर कार्यरत आहेत.तसेच आता नातू अद्वयाने विविध परीक्षांमधून सातत्याने सहभाग घेत आपले व्यक्तिमत्व सिद्ध केले आहे.याचबरोबर मॉडेल इन्व्हाईटेड नेशन चर्चेत सुद्धा त्यांनी सहभाग घेतला असून अभ्यासाबरोबर खेळ व इतर स्पर्धांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग राहिला आहे.कोणताही क्लास न करता स्वयम अध्यायातून त्यानेही यश प्राप्त केले आहे.याबद्दल बोलताना आचार्य गवांदे म्हणाले की,विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे अभ्यास करून दिला पाहिजे मात्र पालकांनी जबाबदारी घेत प्रत्येक विद्यार्थ्याला मोबाईल पासून दूर ठेवले पाहिजे.हसत खेळत शिक्षणाबरोबर मैदानी खेळ ही अत्यंत गरजेचे असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांमध्ये सुद्धा सहभाग घ्या घेतलाच पाहिजे असा आग्रह सुद्धा त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles