शॉक लागून दोघांचा मृत्यू
सूरजच्या कुटुंबीयाला सोमवारच्या दहीहंडी कार्यक्रमात डीजे वाजवण्याची सुपारी मिळाली होती. त्यामुळे त्यांनी नव्याने आणलेल्या डीजेची तपासणी करण्यासाठी सेटअप तयार करून विद्युत जोडणी सुरू केली ही. यासाठी त्यांनी विजवाहक तारांमधून वीज घेण्याचा प्रयत्न केला.
दहीहंडीच्या कार्यक्रमात डीजे वाजवण्यासाठी साऊंडची टेस्टिंग घेणाऱ्या 2 जणांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना वर्धा जिल्ह्यातील सालोड हिरापूर येथे घडली. या घटनेमुळे दहीहंडीच्या आनंदावर दुःखाचे विरजण पडले आहे.