महाराष्ट्र (Maharashtra) :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) (RBI आपल्या मुंबई, चेन्नई, कोलकत्ता आणि दिल्ली रिजन अंतर्गत येणाऱ्या ४ झोन्समध्ये) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हील/ इलेक्ट्रिकल) पदांची भरती करणार आहे. एकूण रिक्त पदे – ११. मुंबई विभागातील RBI ची कार्यालये West Recruitment Zone अंतर्गत येतात.
(१) ज्यु. इंजिनिअर (सिव्हील) – एकूण ७ (३) पदे (वेस्ट झोनमधील पदे – एकूण – ४(१) (अज – १(१), इमाव – १, खुला – २); प्रत्येकी १(१) पद दिव्यांग कॅटेगरी B( D/ HH) आणि C( LD/ CP etc.) साठी राखीव).
रिक्त पदांबरोबर कंसात दिलेली पदे ही बॅकलॉगमधील आहेत.
अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग/ ईडब्ल्यूएस् कॅटेगरीचे उमेदवार जरी रिक्त पदे राखीव नसल्यास अर्ज करण्यास पात्र आहेत. रिक्त पदे नसल्यास त्यासाठी असलेले आरक्षणाचे फायदे त्यांना घेता येणार नाहीत.
पात्रता : (दि. १ डिसेंबर २०२४) रोजी संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण (अजा/अज/ दिव्यांग – ५५ टक्के) आणि संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण (अजा/अज/दिव्यांग – ४५ टक्के) आणि संबंधित कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
ज्यु. इंजिनिअर इलेक्ट्रिकल पदांसाठी इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पदविका/पदवीधारक उमेदवारसुद्धा पात्र आहेत.
वयोमर्यादा : दि. १ डिसेंबर २०२४ रोजी २० ते ३० वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे; दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे; पुनर्विवाह न केलेल्या विधवा/ घटस्फोटित/ कायद्याने विभक्त महिला – ३५ वर्षे, अजा/ अज – ४० वर्षे).
CGPA/ OGPA/ CPI किंवा तत्सम गुणांकन पद्धत असल्यास १० पॉईंट स्केलवर ६.७५ चे सरासरी ६० टक्के गुण, ६.२५ चे सरासरी ५५ टक्के गुण व ५.७५ चे सरासरी ५० टक्के गुण पकडले जातील.
निवड पद्धती : ऑनलाइन एक्झामिनेशन आणि (i) लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट (LPT)