Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

Pune : शिवसेना ठाकरे गटाचा तीन ऑगस्टला मेळावा

पुणे (Pune) 23 जुलै :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा येत्या तीन ऑगस्ट रोजी होणार आहे. या निमित्ताने या पक्षाकडून निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.आगामी विधानसभा निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी आणि इच्छुकांनी (Uddhav Thackeray) मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांवर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. पक्षपातळीवर बैठका, संघटनात्मक बांधणीबरोबरच मेळावे सुरू झाले असतानाच शिवसेनेकडूनही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी कसबा, हडपसर आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे. यातील हडपसर आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार आहेत. त्याचबरोबर कसबा विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेची ताकत आहे. या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात या तिन्ही मतदारसंघांतील इच्छुकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles