मालगाडीची कांचनजंगा एक्स्प्रेसला धडक, 2 डबे घसरले
कोलकाता 17 जून:- पश्चिम बंगालच्या न्यू जलपाईगुडी येथे मालगाडीची कांचनजंगा एक्स्प्रेसला धडक बसून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 60 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर कांचनजंगा एक्स्प्रेसचे 2 डबे रुळावरून घसरलेत.
यासंदर्भात रेल्वे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी (New Jalpaiguri)येथे आज, सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमाराला मालगाडी आणि कांचनजंगा एक्स्प्रेस यांच्यात झालेल्या धडकेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 60 जण जखमी झाले आहेत.त्रिपुरातील आगरतळा येथून कोलकाताच्या सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने मागून धडक दिली. मालगाडीने सिग्नलकडे दुर्लक्ष केले आणि न्यू जलपाईगुडी स्थानकापासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर रंगपानी स्टेशनजवळ उभ्या असलेल्या कांचनजंगा एक्स्प्रेसला मागून धडक दिली. मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला मागून धडक दिली. या घटनेत 3 रेल्वे कर्मचारी आणि 5 प्रवाशांसह एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने कांचनचंगा एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीला धडक बसल्याने मोठी जिवित हानी झाली नाही.
मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला मागून धडक दिली. रेल्वेच्या लोको पायलटने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती पुढे आली आहे. मालगाडीच्या चालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडला आहे. त्यामुळे कांचनजंगा एक्स्प्रेसच्या मागील बाजूच्या गार्डच्या डब्याचे पूर्णपणे नुकसान झाले. या अपघातात मालगाडीचा चालक आणि कांचनजंगाच्या गार्डचाही मृत्यू झाला. कांचनजंगा रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि सीईओ जया वर्मा यांनी सांगितले की, या दुर्घटनेत मानवी चूक असल्याचे दिसते. सिग्नलकडे दुर्लक्ष करून ट्रेन पुढे चालवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आम्हाला ‘कवच’ यंत्रणा वाढवावी लागेल, त्यामुळे गाड्यांची टक्कर टाळता येईल असे जया वर्मा यांनी सांगितले.