भाजपचा नवा अध्यक्ष कोण होणार? 2024 च्या लोकसभा निवडणुकीपासून हा प्रश्न चर्चेत आहे. भाजपचे विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा आता मोदी 3.0 मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून काम करत आहेत, ज्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचा शोध सुरू आहे. अनेक नावांची चर्चा झाल्यानंतर आता महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेपी नड्डा (JP Nadda) यांची जागा घेऊ शकतात, असे मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीत झालेल्या भेटीनंतर फडणवीस भाजपचे नवे अध्यक्ष होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.