Thursday, June 19, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

१ जूनपासून पीएमपी तिकीट दरवाढ; दर सेटचे काम सुरू

पुणे (Pune) :- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMP) संचालक मंडळाच्या बैठकीत गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तिकीट दरवाढीचा ठराव पास केला होता. त्यानंतर, नवीन स्टेजनुसार मशिनमध्ये तिकीट दर सेट करणे आणि इतर तांत्रिक बाबीचे काम पीएमपीकडून सुरू करण्यात आले असून, (दि. १) जूनपासून पीएमपीकडून नव्या स्टेजनुसार तिकीट आकारले जाणार आहे, अशी माहिती पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

पुणे, पिंपरी-चिंचवड, तसेच पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवाशांसाठी बससेवा पुरविण्यात येते. राज्य शासनाच्या २० डिसेंबर २००५ रोजीच्या पत्रास अनुसरून पुणे परिवहन महामंडळाने २० डिसेंबर २०१४ पासून प्रवासी तिकीट दरवाढ केली होती. यामध्ये १ ते ७८ किलोमीटरसाठी २ किमीच्या अंतराने १ ते ४० पर्यंत स्टेज रचना निश्चित करून दर आकारणी करण्यात येत होते. आता त्यात बदल करून ११ स्टेज करण्यात आले आहेत. त्यामुळे स्टेज कमी झाले आहेत. त्यानुसार, तिकीट दर सेट करणे व इतर तांत्रिक बाबी करण्यात येत आहे. पुढील आठ दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आहे.

बस संचलनामध्ये सोयीच्या दृष्टीने सुसूत्रता होण्यासाठी १ ते ३० किमी अंतरासाठी ५ किमीच्या अंतराने ६ स्टेज व त्यापुढे ३० ते ८० किमी अंतरासाठी १० किमीच्या अंतराने ५ स्टेज असे एकूण ११ स्टेज रचनेत किलोमीटर आधारित सहरचना करण्यात आली आहे. पुढील तांत्रिक बाबी पूर्ण करून नवे दर लागू करण्यात येणार आहे.

Pune Metro wiki
Pune map
Pune hagawane case
Pune dowry case
Pune district Name
Pune city area
Pune News Today Live
Pune Pin Code

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles