15 लाख कोटींच्या योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस मंगळवार, 17 सप्टेंबर रोजी खूप खास असणार आहे. तसेच एनडीए सरकार 3.0 चे 100 दिवस पूर्ण होत आहेत. सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालापूर्वीच पंतप्रधान मोदींनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन 100 दिवसांचा रोडमॅप तयार केला होता. निवडणुकीच्या काळात आणि नंतरही विरोधक रोजगाराच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. (Narendra Modi) या 100 दिवसांवर नजर टाकली तर मोदी सरकारने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवले आहे. याशिवाय रोजगार वाढविण्यासाठी पायाभूत सुविधांना चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचबरोबर काँग्रेसने मोदी सरकारकडे 100 दिवसांचा हिशेब मागितला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, एनडीए सरकार आपल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात अपयशी ठरत आहे.
मोदी सरकार 3.0 ने आपल्या कार्यकाळाचे पहिले 100 दिवस पूर्ण केले आहेत. सरकारने पहिल्या 100 दिवसांत सुमारे 15 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले. ज्यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य सेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, ऊर्जा, सुरक्षा, रस्ते, रेल्वे, बंदरे इत्यादींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स मीट अँड एक्स्पो च्या चौथ्या आवृत्तीला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सोमवारी गांधीनगरमध्ये त्यांच्या 100 दिवसांच्या कार्यकाळाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाला भारत हा एकविसाव्या शतकासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे वाटत आहे.
पंतप्रधान म्हणाले, ‘केंद्र सरकारच्या (Central Govt) तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांमध्ये तुम्ही आमचे प्राधान्यक्रम, गती आणि प्रमाण पाहू शकता. देशाच्या वेगवान प्रगतीसाठी आवश्यक असलेले प्रत्येक क्षेत्र आणि समस्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सरकारने पहिल्या 100 दिवसांत ज्या क्षेत्रांना प्राधान्य दिले आहे