नाशिक, ३ जुलै :- जगातील पहिले योग विद्यापीठ म्हणुन प्रसिद्ध असलेले बिहार योग विद्यालय, विश्व योगपीठ, मुंगेरे यांचे मार्गदर्शना खाली नाशिक नगरीत दि. ५ ते ७ जुलै दरम्यान श्रध्दा लाॕन्स, सुविद्या पेट्रोल पंप जवळ, गंगापुर रोड सर्कल पासुन हनुमान वाडी रोड, पंचवटी नाशिक येथे सकाळी आणि सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत योग साधना सत्र आयोजित केलेले आहे. या योग सत्रांमध्ये स्वामी शिवराजानंद सरस्वती मार्गदर्शन करणार आहेत यासाठी सर्वांना मुक्त प्रवेश आहे.
नाशिक नगरीत योगगुरु नंदकुमार देसाई यांचे पुढाकाराने व गोदा श्रध्दा फाऊंडेशन चे संस्थापक सुरेश अण्णाजी पाटील यांचे सौजन्याने हे योग साधना सत्र आयोजित करण्यात आले आहे. बिहार योग विद्यालयाचे कार्य सहा दशकांपासुन देशविदेशात अखंडपणे सुरु आहे. आज हे केंद्र विश्वाचे योग केंद्र बनले आहे. तरी नाशिक नगरीतील नागरीकांनी उपस्थित राहुन या तीन दिवसीय योग सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केले आहे.