पुणे:-पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris 2024 Olympics)५० मीटर थ्री पोझिशन प्रकारामध्ये मराठमोळा नेमबाज स्वप्नील कुसाळे याने कांस्यपदक (Bronze medal)पटकावत इतिहास रचला. थ्री पोझिशन प्रकारामध्ये पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. स्वप्नील हा कोल्हापूरमधील (Kolhapur) करवीर तालुक्यातील कांबळवाडी येथील रहिवाशी आहे. दरम्यान, स्वप्नील कुसाळे हा पॅरिसवरून आज पुण्यात दाखल झाला. यावेळी स्वप्नीलचं पुणे विमानतळावर आणि पुणे (Pune)शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर स्वप्नीलने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतलं आणि आरती देखील केली.
नेमबाज स्वप्नील कुसाळे याने आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे हा पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे. यापूर्वी २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये जॉयदीप कर्माकरने या स्पर्धेत चौथे स्थान पटकावले होते.
नेमबाज स्वप्नील कुसाळे याने पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. यानंतर आज स्वप्नील पुण्यात दाखल झाल्यानंतर स्वप्नीलची जंगी मिरवणूक काढण्यात आली. पुण्यात स्वप्नीलने काही दिवस नेमबाजीचा सराव केला होता. त्यामुळे आज स्वप्नील पुण्यात दाखल झाल्यानंतर पुण्यातील बालेवाडीमध्ये ढोल ताशांच्या गजरात स्वप्नीलची जंगी मिरवणूक काढण्यात आली. याचबरोबर स्वप्नीलचं ठिकठिकाणी जंगी स्वागत केलं जात आहे.