Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

केजरीवाल, सिसोदिया व कविताच्या कोठडीत वाढ !

नवी दिल्ली (New Delhi) 25 जुलै:- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित सीबीआय प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. आता 8 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केजरीवाल यांची हजेरी झाली. सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगातूनच अटक केली होती. केजरीवाल यांच्याशिवाय माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि बीआरएस नेत्या के कविता देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाले होते. राऊस अव्हेन्यू कोर्टाने मनीष सिसोदिया आणि के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत 31 जुलैपर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी 12 जुलै रोजी न्यायालयाने भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत शुक्रवार 25 जुलैपर्यंत वाढ केली होती.

उत्पादन शुल्क धोरणासाठी प्रकरणात सीबीआय त्यांची चौकशी करत आहे. केजरीवाल यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना सीबीआय आणि ईडीशी संबंधीत प्रकरणात हजर करण्यात आले होते.

दुसरीकडे, दिल्ली उच्च न्यायालयाने 17 जुलै रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला. केजरीवाल यांनी त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. संपूर्ण पुरावे उपलब्ध झाल्यानंतरच कायद्यानुसार अटक करण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे. न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांनीही केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles