Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

“लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही”-नरहरी झिरवाळांचे विधान

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जोरावर राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुती सरकारने एकहाती सत्ता मिळवली होती. लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर महायुती सरकारने लाडक्या बहि‍णींचे आभार मानले होते. मात्र निवडणुकीआधी जाहीरनाम्यामध्ये महायुती सरकारने निवडून आल्यास लाडक्या बहि‍णींना १५०० ऐवजी २१०० रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र सरकारच्या तिजोरीवर भार पडत असल्याने अद्याप त्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. यावरुन विरोधक सरकारवर टीका करत आहेत. अशातच महायुती सरकाच्या कॅबिनेट मंत्र्यांनी लाडक्या बहिणी १५०० रुपयांमध्ये खूष असल्याचे म्हटलं आहे.

लाडक्या बहि‍णींच्या एप्रिलच्या (Ladki Bahin Yojna) हप्त्यावरुन सरकारची टोलवाटोलवी सुरु आहे. अशातच लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटले नाही असं विधान अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे. लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये पुरेशे आहेत असेही नरहरी झिरवाळ म्हणाले. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे २१०० रुपये कधी मिळणार? याकडे लाडक्या बहि‍णींचं लक्ष लागलेलं असताना नरहरी झिरवाळ यांनी मोठं विधान केले आहे.

“लाडक्या बहिणी नाराज आहेत हे फक्त विरोधकच सांगत असतात. सर्व बाजूंनी लाडक्या बहिणी खूष आहेत. २१०० रुपये देणार असं कोणी जाहीर केलेले नाही. विरोधकांनी आधी म्हटलं की महायुती लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये देणार नाही. कारण त्यांच्याकडे १५०० रुपये देण्याची ऐपत नाही. त्यानंतर त्यांनी म्हटलं की २१०० रुपये देणार आणि मग १५०० रुपये दिले नाहीत तर २१०० कसे देणार?  अशा पद्धतीचे आरोप सुरु केले होते. १५०० रुपये दिल्यावर त्यांनी २१०० रुपयांव जोर धरला. तो असा काही प्रकार नाही. लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये देखील परिपूर्ण आहेत. लाडक्या बहिणी १५०० रुपयांमध्ये खूश आहेत,” असे विधान नरगही झिरवाळ यांनी केले.

मुख्यमंत्री माझी लड़की बहिन योजना क्या है?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles