Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

नवनीत राणा पुन्हा लोकसभेच्या रिंगणात

नांदेड पोटनिवडणुकीत होणार पुनर्वसन

अमरावती (Amravati) :- नांदेडची पोटनिवडणूक घोषित झाल्यानंतर काँग्रेसकडून वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात सुरुवातीला राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती समोर आली होती. मात्र अशोक चव्हाण यांनी मी ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे (Ravindra Chavan) म्हटले. यानंतर आता भाजप नेत्या नवनीत राणा या नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसोबत नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची देखील घोषणा केली. काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेडची जागा रिक्त झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानादिवशीच म्हणजे 20 नोव्हेंबरलाच या लोकसभेसाठी मतदान आणि 23 नोव्हेंबरला निकाल असणार आहे.

काँग्रेसने या जागेवर वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. तर एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील नांदेडमधून पोटनिवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. आता भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांचे नाव या निवडणुकीसाठी समोर येत आहे. त्यामुळे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Amravati district wikipedia
Amravati history in marathi
Amravati is in which state
Amravati map
Amravati Hyderabad
Amravati famous for
Amravati tourism
Amravati History

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles