Sunday, June 22, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांचा नरेश म्हस्के यांना पाठिंबा

नवी मुंबई :  भाईंदरच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्व असलेले माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांनी ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. गिल्बर्ट मेंडोंसा यांच्या पाठिंब्यामुळे विजयाच्या मताधिक्यात मोठी वाढ होईल, असा विश्वास नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला.

माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा हे मीरा भाईंदर शहराचे गेली अनेक वर्ष नेतृत्व करत आहेत. शहरात एक व्यक्ती म्हणून गिल्बर्ट मेंडोंसा यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मीरा भाईंदर पालिकेची स्थापना झाल्यानंतर २००२ साली गिल्बर्ट मेंडोंसा यांच्या पत्नी मायरा मेंडोंसा यांना प्रथम महापौर पदाचा मान मिळाला होता. गिल्बर्ट मेंडोंसा यांची कन्या कॅटलिन परेरा यांनीही महापौर पद भूषविले आहे. आमदार असतांना गिल्बर्ट मेंडोंसा यांनी शहराच्या विकासासाठी विधानसभेत आवाज उठवून शहराचा विकास केला होता.ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना पाठिंबा देण्यासाठी गिल्बर्ट मेंडोंसा यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वानुमते नरेश म्हस्के यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

एकही दिवस सुट्टी न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पाठिंबा देत असल्याचे गिल्बर्ट मेंडोंसा यांनी सांगितले.नरेश म्हस्के यांनी गिल्बर्ट मेंडोंसा यांची सदिच्छा भेट घेत पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.यावेळी ठाण्याच्या माजी महापौर सौ. मीनाक्षी शिंदे, मिरा भाईंदरच्या माजी महापौर कॅटलिन परेरा आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles