Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

Nagpur : फुटपाथवर झोपलेल्या 8 जणांना चिरडले

अपघातात दोघांचा मृत्यू 5 जण गंभीर जखमी

नागपूर 17 जून:- नागपुरात सोमवारी मध्यरात्रीच्या एका वेगवान कारचालकाने फुटपाथवर झोपलेल्या 8 जणांना चिरडल्याची घटना घडली. यात दोघांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी आहेत. शहरातील दिघोरी चौकाजवळ सोमवारी मध्यरात्री हा अपघात घडला. याप्रकरणी मद्यधुंद कारचालकाला अटक करण्यात आलीय.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री 12.15 वाजेच्या सुमारास फुटपाथवर काही लोक झोपले होते. हे लोक रस्त्यावर खेळणे विकून उदरनिर्वाह करणारे लोक होते व त्यात महिला-मुलांचादेखील समावेश होता. उमरेड मार्गाकडे जाणाऱ्या भरधाव कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले व कार थेट फुटपाथवर चढली. यात फुटपाथवर झोपलेल्या 3 महिला, 4 मुले व एका पुरुषाच्या अंगावर कार गेली. यामुळे जोरदार आवाज झाला व एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.

कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच वाठोडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. सर्व जखमींना उपचारासाठी मेडिकल रुगणालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून लगेच शोधमोहीम राबविली. त्या आधारे कारचालक भूषण लांजेवार याला अटक करण्यात आली. तो दारूच्या नशेत कार चालवत होता. अपघाताला बळी पडलेल्या 5 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांचा उपचार सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजय दिघे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles