नागपुरात मेट्रो प्रकल्पाच्या माध्यमाने किफायतशीर आणि सुखकर प्रवासाची सोय झाल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये जाणे अतिशय सुविधेचे झाले आहे. सोबतच विद्यार्थ्यांकरिता महा कार्डवर सवलत देण्यात आली आहे, त्यामुळे ते खिशाला परवडणारे देखील आहे. एकीकडे या माध्यमाने विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर होत असतानाच, दुसरीकडे नागपूर मेट्रोच्या मदतीने नागरिकांना देखील सोयीचे झाले आहे.
नागपूरमध्ये नागरिकांना वाहतूकीपासून त्रास कमी होण्यासाठी व वाहतुकीवर पडणारा ताण, छोट्या रस्त्यांमुळे होणारे अपघात, प्रदूषण, पार्किंग प्रश्न इत्यादींवर उपाय म्हणून मेट्रो सेवा सुरु करण्यात आली आहे. कायमस्वरूपी वेगवान व विनाअडथळा वाहतूक, वायू व ध्वनी प्रदूषणात घट, इंधन बचत, परकीय चलनात बचत स्थानकावर उतरल्यानंतर प्रवाशास पुढे इच्छित स्थळी मार्गक्रमणासाठी, शटल बसेस, बॅटरीवर चालणारी वाहने, पादचारी सेवा व सहभागी तत्त्वावर सायकली इत्यादी सेवा दिल्या जात आहेत. सर्व वर्गातील प्रवाशांना ही सेवा उपलब्ध असेल. जेणेकरून त्यांना आपले घर अथवा कार्यालयातून मेट्रोच्या स्थानकापर्यंत पोहोचणे सोयीचे होईल.