उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
मुंबई (Mumbai):- गेल्या काहि दिवसांपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चोहरा कोण असेल अशी चर्चा होती.आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षविधान करुन चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा उद्धव ठाकरे असतील, अशी चर्चा रंगली होती. त्यावरुन ठाकरेंनी विरोधकांना सुनावत एक वक्तव्य केलं आहे.
तुम्ही आता तुमच्यातील कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल, असे ते म्हणाले. मुंबईतील (Mumbai) षण्मुखानंद सभागृहात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पार पडला. या मेळाव्याच्या सुरुवातीलाच भाषण करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली.