Friday, August 1, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

मुंबईला मिळाले नवे पोलीस आयुक्त; देवेन भारतींना मिळाला पदभार

Mumbai :- पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. हल्ल्यानंतर विरोधकांनी एकमताने केंद्र सरकारला पाठिंबा दिला असला तरी काही नेत्यांनी हल्ल्यानंतर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर टीका केली. काँग्रेसने पंतप्रधान बेपत्ता असल्याची पोस्ट केली. त्यानंतर ती पोस्ट डिलीट केली. तसेच महाराष्ट्रातही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, संजय राऊत यांनी सरकारसमोर विविध प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची निवृत्त झाले असून देवेन भारती हे नवे पोलिस आयुक्त असतील. देवेन भारती यांनी मुंबई व परिसरात अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. नवीन आयुक्तांच्या निवडीसाठी अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. यात देवेन भारती यांचे नाव आघाडीवर होते. ते १९९४ च्या बॅचचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत सध्या पोलिस मुख्यालयात विशेष पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते.

देवेन भारती (Deven Bharti) त्यांनी मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त, मुंबईत सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) पदावर काम केले आहे. त्यानंतर त्यांनी मुंबई गुन्हे अन्वेशन शाखेचे सहाय्यक आयुक्त व महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles