जगात तणाव आणि संघर्षाची परिस्थिती असताना क्वाड शिखर परिषद होत आहे. अशावेळी क्वाड देशांनी सामायिक लोकशाही मूल्यांच्या आधारावर एकत्र काम करणे संपूर्ण मानवतेसाठी खूप हिताचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अमेरिकेत चौथ्या क्वाड शिखर परिषदेत व्यक्त केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra MOdi) ‘क्वाड’ देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या चौथ्या बैठकीसाठी अमेरिकेत आहेत. शनिवारी २१ सप्टेंबर रोजी चौथ्या क्वाड शिखर परिषदेत ते सहभागी झाले होते. विल्मिंग्टन, डेलावेअर येथे झालेल्या या बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा सहभागी झाले. बैठकीत आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली
माझ्या तिसऱ्या कार्यकाळात मी क्वाड शिखर परिषदेत सहभागी होतो आहे, याचा मला आनंद आहे. २०२१ ची पहिली क्वाड परिषद अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. अमेरिकेने (Amerika) कमी कालावधीत या परिषदेला प्रत्येक प्रकारचं सहकार्य केलं आहे. या परिषदेत अमेरिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अमेरिकेच्या क्वाडमधील योगदानाबाबत मी त्यांचे मनापासून आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली.