Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

In Kanholi : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

गुमगाव :  हिंगणा तालुक्यातील गुमगाव नजीकच्या कान्होली येथील सार्वजनिक वाचनालयात दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी (presided over the programme) कान्होली-धानोलीच्या सरपंच प्रियंका इटनकर, शिक्षक मधुसूदन चरपे,सेवानिवृत्त शिक्षक चंदू मून,उपसरपंच मिलिंद कोवे,ग्रामपंचायत सदस्य सुनीता वलके,दिपाली करपते,दिपाली वलके, शितल कोवे,काजल कोवे,गणेश इटनकर, प्रमोद बावणे ,विकास करपते,प्रदीप इटनकर व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते जयश्री आडे, तन्मय कोवे,भावेश वलके,विनयन वरखडे,अनु वलके,निशा गोंडगे,शिवानी उईके,माधुरी आडे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंगल कोवे,भावेश वलके,राज कळंबे,कुणाल कोवे, सोनिया कोवे,भाग्यश्री आडे,सेजल कोवे, अमोल कोवे,समीक्षा कंगाले,नीता रंदई,नंदिनी कुमरे,खुशी इटनकर यांनी पुढाकार घेतला. भाग्य श्री आडे हीने आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles