नागपूर :- राष्ट्रीय अखिल कुणबी महासंघाची बैठक 30 जुन रोजी रवीभवन सिव्हिल लाईन नागपूर येथे डी. के. आरीकर चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रीय अखिल कुणबी महासंघाची सभा नुकतीच पार पडली.
या सभेची सुरुवात श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सभेत सर्व शाखीय कुणबी समाजाच्या संघटनेबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. संघटने अभावी कुणबी समाजावर आज पर्यंत आणि भविष्यात होणाऱ्या अन्याय बाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. सभेमध्ये खालील विषयावर चर्चा करण्यात आली.
1) पोट जातीत विखुरलेला समाज एकत्र कसा येईल ?
2) महाराष्ट्र तसेच देशामध्ये कुणबी समाजाची बांधणी कशी करता येईल.
3) कुणबी म्हणजे शेतकरी या समाजावर निसर्ग तसेच शासन यांच्याकडून होणारा अन्याय कसा दूर करता येईल.
4) कुणबी समाजाच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय आरक्षणावरती चर्चा करून शासनावर कशाप्रकारे दबाव टाकता येईल ?
5) ओबीसी संवर्गात सर्वात मोठा घटक कुणबी असून, या कुणब्यांवर ओबीसी प्रवर्गाची यादीत इतर समाजांना समाविष्ट करून होणाऱ्या अन्यायाबाबत चर्चा करणे.
6) कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करून ओबीसी यादीत समाविष्ट करू न देण्याबाबत चर्चा करणे.
उपरोक्त मुद्द्यांवरती अत्यंत गांभीर्याने यावेळी सभेत चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये कुणबी शाखेच्या सर्व शाखेतील प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी सुरेश गुडदे पाटील, सुरेशभाऊ कोंगे, सुरेशभाऊ वर्षे, बापू बोडारे, गुणेश्वरजी आरीकर, डॉ.बळवंत भोयर, गिरीश बोभाटे, सुषमाताई भड, प्रा. सुधाकर भड, अरुणाताई भोंडे, ॲड. रेखाताई बाराहाते, अर्चनाताई बर्डे, प्रा.शेषराव येलेकर, खुशाल शेंडे, दामोदरजी तिवाडे, दादाजी चौधरी, महादेवजी वैद्य, विजय शिवणकर, डॉ.तुकाराम धोबे, प्रा.विनय बाराहाते, मोहन थुटे, अमोल हाडके, गिरीश कावळे, पी. आर. भोपे, सुधीर हिवरकर, प्रभाकर काळे, दादाराव डोंगरे, सुरेश कोंगे, भागवत कारमोरे, नेमदास मस्की, राजेश पिंपळे, आर.पी.चौधरी, अरुण वनकर, प्रा. बी के भोंडे ईत्यादी तसेच विदर्भातील समाजबांधव उपस्थित होते.