Thursday, August 7, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

महाराष्ट्र हादरला! जन्मदात्या पित्याचा 6 वर्षाच्या लेकीवर बलात्कार

 

मुंबई (Mumbai) :- नवी मुंबईत एकाच दिवशी बलात्काराच्या दोन घटना घडल्या आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे. जन्मदात्या पित्याचा 6 वर्षाच्या लेकीवर बलात्कार केला आहे. तर, दुसऱ्या घटनेत स्कूल बस चालकाने चार वर्षाच्यामुलीवंर लैंगिक अत्याचार केला आहे.

पहिली घटना पनवेलमध्ये घडली आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. जन्मदात्या पित्याने आपल्या सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. जयेश पाटील असे या नराधम पित्याचे नाव आहे. जयेश पाटील विरोधात बलात्कारसह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी जयेश आणि त्याच्या पत्नीमध्ये घटस्फोट झाला असून मुलीचा ताबा न्यायालयाने जयेश कडे दिला होता. मागील 15 दिवसांपासून नराधम पिता आपल्याच मुलीवर अतिप्रसंग करत होता. लघवीच्या जागेवर आणि पोटात दुखतं असल्याचे पीडितेने नातेवाईकांना सांगितल्यावर आईच्या मदतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पनवेल तालुका पोलीसांनी आरोपी जयेश पाटील याला अटक केली असून अधिक तपास करण्यात येत आहे.

दुसऱ्या घटनेट स्कूल बसच्या चलाकाने विद्यार्थीनीवर अत्याचार केला आहे. नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेच्या बस चालकाने चार वर्षीय विद्यार्थी मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचं बाब समोर आली आहे. याबाबत विद्यार्थ्याच्या पालकांनी एनआरआय पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल असून आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास तांत्रिक दृष्टीने देखील केला जात आहे. तब्बल 44 CCTV चे फुटेज तपासण्यात येत आहे , बस मधील cctv आणि बस अटेंडन्स चा जबाब नोंदविण्यात Ene. अधिक तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles