Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

केजरीवालांच्या कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली19 जून:- दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला होता. न्यायालयाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 जूनपर्यंत वाढ केली होती.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या मद्य धोरण प्रकरणी राऊस एव्हेन्यू कोर्टाने न्यायालयीन कोठडी वाढवली होती. न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) म्हटले होते की राजधानीतील दारूच्या व्यापारात गुंतवणूक करण्याच्या बदल्यात पंजाबमधील व्यावसायिकांकडूनही लाच घेण्यात आली होती. त्यांनी असेही म्हटले होते की आम आदमी पार्टीचे (आप) शासन असलेल्या पंजाबमधील ज्या व्यावसायिकांनी लाच दिली नाही त्यांना शेजारच्या राज्यात दारूच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याची परवानगी नव्हती. पहिल्यांदाच एखाद्या राजकीय पक्षाविरुद्ध प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ऍक्ट (Prevention of Money Laundering Act) (पीएमएलए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles