Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

To Kejriwal : रविवारी सरेंडर करावेच लागणार

अंतरिम जामीनावर 5 जून रोजी सुनावणी होणार

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि मद्य धोरण घोटाळ्यातील आरोपी अरविंद केजरीवाल यांना यांना उद्या, रविवारी तुरुंगात सरेंडर करावे लागणार आहे. दिल्लीच्या राऊस ऐव्हेन्यू कोर्टाने केजरीवालांच्या अंतरिम जामिनाचा निकाल राखून ठेवला असून 5 जून रोजी निकाल जाहीर होईल. त्यामुळे केजरीवाल यांना तुर्तास पुन्हा कारागृहात जावे लागणार आहे.

केजरीवाल यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन देण्यात आला होता. निवडणूक संपल्यानंतर त्यांना तुरुंगात पुन्हा जावे लागणार होते. हा जामीन आणखी आठवड्याभराने वाढविण्याची मागणी केजरीवाल यांनी केली होती. यासाठी केजरीवाल यांनी त्यांच्या आरोग्याचे कारण दिले होते. त्यांना पीईटी, सीटी स्कॅन आणि अन्य काही टेस्ट करायच्या असल्याचे त्यांचे म्हणणे होते. यासाठी त्यांना 7 दिवसांचा वेळ मिळावा अशी मागणी करण्यात आली होती. अटकेनंतर केजरीवालांचे वजन 7 किलोंनी कमी झाल्याचा दावा आम आदमी पार्टीने केला होता. तसेच त्यांची कीटोन लेव्हल खूप जास्त असल्याचेही म्हटले होते. यावर ईडीने केजरीवाल यांचे वजन कमी नाही तर उलट एक किलोने वाढल्याचा दावा केला होता.

दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवाल यांना गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाकडून(from the court)दिलासा मिळाला होता. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात केजरीवाल यांना 21 मार्च रोजी ईडीने अटक केली होती. जामिन देताना सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना कोणत्याही साक्षीदाराशी बोलू नये असे निर्देश दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles