ऑगस्ट महिन्यात विमान सेवा सुरु करण्याचे निर्देश
अमरावती19 जून:- अमरावती विमानतळाच्या अद्ययावतीकरणाच्या शासनाच्या निर्णयानुसार अत्याधुनिक विमानतळ अमरावतीत साकारण्यासाठी अपेक्षित कामे मिशनमोडवर पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार निधी उपलब्धता व इतर बाबींसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी दिली. त्यांनी आज बेलोरा विमानतळावर जाऊन पाहणी केलीबडनेरानजीक बेलोरा विमानतळाचे लवकरच विस्तारीकरण होणार असून, सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीची लांबी १३०० मीटरवरून १८०० मीटर केल्या गेलेली आहे. जवळपास २०० एकरात विस्तारलेले हे विमानतळ ऑगस्ट २०२४ शुभमुहूर्तावर पूर्ण क्षमतेने सुरू होईल. या ठिकाणी एटीआर स्वरूपाची ७२ आसनी विमाने उतरणार आहेत. एवढेच नव्हे तर रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची सोयदेखील होणार आहे. बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच पूर्ण होऊन या ठिकाणाहून विमानसेवा सुरू होईल. असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
खासदार माननीय बळवंत भाऊ वानखडे आणि माजी मंत्री सुनील भाऊ देशमुख माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी सकाळी अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला भेट देऊन अधिका-यांशी चर्चा केली व संपूर्ण विमानतळाची पाहणी केली.